Ad will apear here
Next
गोखले, दाढे यांचा उद्या गौरव
पुणे : ‘देणे समाजाचे’ हा उपक्रम चालवणाऱ्या वीणा गोखले आणि भगिनी निवेदिता बँकेच्या संस्थापक अध्यक्षा मीनाक्षी दाढे यांना उद्या, २६ मार्च रोजी स्नेहाधार गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पीडित व अत्याचारित महिलांना दिलासा देण्याचे काम करणाऱ्या स्नेहालय संस्थेच्या स्नेहाधार या पुण्यातील प्रकल्पाच्या वर्षपूर्तीनिमित्त हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. उद्या, २६ मार्च रोजी पुण्यातील ज्योत्स्ना भोळे सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

स्नेहाधार ही संस्था वंचित, पीडित, अत्याचारित, संकटग्रस्त, निराधार महिलांसाठी काम करते. संकटात सापडलेल्या महिलांना आधार आणि आश्रय देण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते. पुण्यामधील आंबेगाव येथे गेल्या वर्षी ‘स्नेहाधार’चे केंद्र सुरू करण्यात आले. कोणतीही सरकारी मदत न घेता केवळ समाजातील दानशूर लोकांनी केलेल्या मदतीवर ही संस्था चालू आहे. ‘स्नेहाधार’ला पुणेकरांकडून आर्थिक आणि वेगवेगळ्या वस्तूंच्या रूपात मदत मिळत आली आहे. त्याचप्रमाणे इतर गरजू, संकटग्रस्त महिलांपर्यंत पोहोचण्याचे काम संस्थेतर्फे सातत्याने चालू असते. या सगळ्याविषयी कृतज्ञता म्हणून या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. 

डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, कार्यक्रमाला ‘स्नेहालय’चे संस्थापक गिरीश कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RYZEBA
Similar Posts
देवी : एकाच क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान मायलेकींच्या मुलाखती वडिलांचा व्यवसाय पुढे नेणारी मुले बरीच असतात; पण आईचा व्यवसाय पुढे सुरू ठेवणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी असते. तसेच आईच्या व्यवसायाची परंपरा पुढे नेणाऱ्या मुली तर त्याहूनही कमीच असतात. ही बाब लक्षात घेऊन ‘सुकृति’ने एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या मायलेकींच्या मुलाखतींची मालिका नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित केली आहे
अर्भकाला जीवनदान देणाऱ्या कचरावेचक महिलांचा सत्कार पुणे : विश्रांतवाडीतील एकतानगरमध्ये कचराकुंडीत टाकलेल्या नवजात मुलीला जीवदान देणाऱ्या लक्ष्मी राजू डेबरे आणि मंगल जाधव या कचरावेचक महिलांचा पुणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी स्वच्छ संस्थेच्या व येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला
गायिका अर्चना पोतनीस यांची सांगीतिक मुलाखत (व्हिडिओ) आपल्या गोड, सुरेल आवाजाने संगीतरसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका अर्चना पोतनीस यांच्या सांगीतिक मुलाखतीचं आयोजन नुकतंच सूर-सखी मंचातर्फे करण्यात आलं होतं.
‘मिळून साऱ्याजणी’च्या वेगळ्या मुखपृष्ठांची कहाणी... ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका विद्या बाळ यांचं ३० जानेवारी २०२० रोजी निधन झालं. स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याचं आणि समाजाला स्त्रियांसंदर्भात सजग आणि संवेदनशील बनवण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांनी आयुष्यभर केलं. ‘मिळून साऱ्याजणी’ हे त्यांनी चालविलेलं मासिक हा त्याच कार्याचा एक भाग होता. या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language